आमच्याबद्दल
"सेवा, समर्पण आणि समाजविकास हाच आमचा संकल्प"
२०२६
पासून कार्यरत
आम्रपाली सामाजिक व
बहुउद्देशीय संस्था
आम्रपाली सामाजिक व बहुउद्देशीय संस्था ही गावठाण आलेगाव, ता. सांगोला, जि. सोलापूर येथे स्थापित एक स्वयंसेवी संस्था आहे. समाजातील गरजू, वंचित, महिला, युवक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था अविरत कार्यरत आहे.
संस्थापक अध्यक्ष मा. अभिमन्यू शंकर गडहिरे यांच्या प्रेरणेने व समर्पित पदाधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमाने संस्था आज १२ हून अधिक गावांमध्ये कार्यरत असून १,५०० हून अधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे.
एक सशक्त, स्वावलंबी व समृद्ध ग्रामीण समाज निर्माण करणे जिथे प्रत्येकाला समान संधी मिळेल.
शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण व युवा विकासाद्वारे समाजाचे सर्वांगीण उत्थान घडवणे.
आम्ही काय करतो?
समाजाच्या विविध गरजा ओळखून त्यावर ठोस उपाययोजना करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
शिक्षणाचा प्रसार
ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शाळा सहाय्य, शिष्यवृत्ती व अभ्यासिका उपक्रम.
महिला सक्षमीकरण
महिलांना आर्थिक व सामाजिक स्वावलंबन मिळावे यासाठी बचत गट, प्रशिक्षण व उद्योजकता कार्यक्रम.
आरोग्य जनजागृती
मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान, आरोग्य शिक्षण व ग्रामीण आरोग्य सेवा उपलब्ध करणे.
पर्यावरण संवर्धन
वृक्षारोपण, स्वच्छता अभियान व पर्यावरण जनजागृतीद्वारे निसर्गाचे रक्षण करणे.
युवा विकास
तरुणांमध्ये नेतृत्वगुण, कौशल्य विकास व उद्योजकता वाढवण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे व कार्यशाळा.
ज्येष्ठ नागरिक सेवा
वृद्ध व एकाकी ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक, वैद्यकीय व भावनिक आधार देणे.
खालीलप्रमाणे राहतील


शैक्षणिक
- शैक्षणिक कार्यक्रम करणे — बालवाडी, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, निवासी इंग्लिश मेडीअम स्कूल, हायरस्कूल, कन्या विद्यालय, रात्र शाळा सुरु करणे.
- संगणक व टायपिंग प्रशिक्षण केंद्र सुरु करणे.
- निराधार व निराश्रितांसाठी व अनाथ मुलां-मुलींसाठी अनाथाश्रम, आश्रमशाळा चालविणे, वसतीगृह, मतीमंद, मुकबधीर व अपंग व्यक्तींच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण केंद्र चालविणे.
- कला, क्रीडा व उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना मार्गदर्शन देणे. स्पर्धा परिक्षा केंद्र सुरु करणे.
- विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन करणे. व्यवसायिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरु करणे.
क्रीडा
- खेळांचे सामने भरविणे व त्यात भाग घेणे. कोचींग कॅम्प आयोजित करणे, व्यायामशाळा चालविणे.
- व्यायामाचे व योगासनाचे प्रशिक्षण देणे.
- क्रीडा प्रेमींना क्रीडा साहित्य उपलब्ध करुन देणे. व्यायाम प्रेमींना वायामाचे साहित्य उपलब्ध करुन देणे.
सामाजिक
- सामाजिक शिबिरे आयोजित करणे, बालसदन, बालसंगोपन, बालगृह, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, अपंगाश्रम, विधवाश्रम, महिलाश्रम, बालकाश्रम चालविणे.
- दारुबंदी, हुंडाबंदी याबाबत कार्यक्रम सादर करणे, वृक्षारोपण करणे, राष्ट्रीय सण व उत्सव साजरे करणे.
- महापुरुषांचे जयंती उत्सव साजरे करणे. अंध, अपंग, गोर गरीब व गरजूंना अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करणे.
- गोर गरिबांच्या विवाह व अंत्य समयी मदत करणे. सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणे.
- मोफत सार्वजनिक वाचनालय चालविणे. विविध क्षेत्रातील नामवंत व गुणवंत व्यक्तींचा सत्कार करणे व त्यांना पुरस्कार प्रदान करणे.
- रक्तदान शिबिरे आयोजित करणे. आरोग्य शिबिरे आयोजित करणे. कला, क्रीडा, संगीत, काव्य, गायन, वादन, चित्रकला इत्यादी ललित कलांच्या स्पर्धा भरविणे व प्रशिक्षण देणे.
आरोग्य विषयक
- वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य विषयक शिबिरांचे आयोजन करणे, रक्तदान नेत्रदान इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करुन त्याचे महत्व समाजास पटवून देणे.
- पॅरामेडिकल वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणे. आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार करणे, वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देणे, पशुवैद्यकीय उपचार केंद्र सुरु करणे.
- शव वाहिका ॲम्बुलन्सची सोय करणे, रक्तदान शिबिरे आयोजित करणे, मरणोत्तर व नेत्रदान व देहदानासाठी लोकांना प्रवृत्त करण्यासाठी योजना राबविणे.
- व्यसनमुक्ती सेवा केंद्र सुरु करणे. योगा, प्राणायाम याबाबत समाजामध्ये जनजागृती करणे.
पर्यावरण
- पर्यावरण समतोल राखण्यासाठी शिबिरे, चर्चासत्रे, मेळावे यांचे आयोजन करुन त्यामार्फत पर्यावरणाचे महत्व पटवून देणे, पशुपालनासंबंधी मार्गदर्शन करणे.
- प्रदुषण रोखण्यासाठी उपक्रम राबविणे. पशुधन संवर्धन व संरक्षण करण्यासाठी पशुपालन करणे.
- पवन व सौर ऊर्जा बाबत नागरिकांना माहिती देणे, त्याचे प्रशिक्षण देणे व त्याबाबत मार्गदर्शन करणे.
- जनतेला स्वच्छतेचे महत्व पटवून देणे व आदर्श व स्वच्छ भारत निर्मितीसाठी प्रयत्न करणे व स्वच्छता विषयक योजना राबविणे.
- आयुर्वेदिक व वनौषधी वनस्पती लागवड करणे तसेच त्याचे महत्व समाजास पटवून देणे.
सांस्कृतिक
- सांस्कृतिक कार्यक्रम करणे, उदा. कलापथक, नाट्य, एकांकिका, गाइन, वादन, यांच्या स्पर्धा आयोजित करणे. साहित्य आणि सांस्कृतिक अभिवृद्धीसाठी प्रयत्न करणे.
- कला, क्रीडा, काव्य, गायन, संगीत इत्यादींच्या स्पर्धा आयोजित करणे व प्रशिक्षण देणे. सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करणे.
- सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करणे. नवरात्र उत्सव, गणेश उत्सव साजरे करणे व शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह थोरामोठ्यांची जयंती उत्सव व पुण्यतिथी साजरे करणे.
- सांस्कृतिक कार्यक्रम व उत्सवांचे आयोजन करणे.
संस्थेचा इतिहास
संस्थेची स्थापना
आलेगाव येथे आम्रपाली सामाजिक व बहुउद्देशीय संस्थेची अधिकृत नोंदणी व स्थापना.
पहिले शिष्यवृत्ती वितरण
१५ गरजू विद्यार्थ्यांना पहिल्यांदा शिष्यवृत्ती वितरित करण्याचे संस्थेचे ध्येय आहे.
महिला बचत गट
गावांमध्ये महिला बचत गट स्थापन करून महिला सक्षमीकरणाची सुरुवात करण्याचे संस्थेचे ध्येय आहे.
आरोग्य शिबीर मोहीम
वर्षभरात मोठी आरोग्य तपासणी शिबिरे — ५०० हून अधिक ग्रामस्थांना लाभ देणे हे संस्थेचे ध्येय आहे.
कौशल्य विकास केंद्र
युवकांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सुरू करून — पहिल्या बॅचमध्ये ३० युवक प्रशिक्षण देणे हे संस्थेचे ध्येय आहे.
विस्तार व वृद्धी
महाराष्ट्र मध्ये कार्यविस्तार, १,५०० हून अधिक लाभार्थी व ५० उपक्रम पूर्ण करणे हे संस्थेचे ध्येय आहे.
कार्यकारिणी सदस्य
संस्थेच्या यशामागे या समर्पित पदाधिकाऱ्यांचे अथक परिश्रम आहेत.

मा. अभिमन्यू शंकर गडहिरे
संस्थापक अध्यक्षसंस्थेचे संस्थापक व प्रेरणास्थान. समाजसेवेची तीव्र इच्छाशक्ती व नेतृत्वगुणांनी संस्थेला नवी दिशा दिली.

मा. जयसिंग विरभद्र गडहिरे
उपाध्यक्षसंस्थेच्या विविध उपक्रमांचे नियोजन व समन्वय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
.jpg)
सौ. प्रज्ञा गडहिरे
सचिवसंस्थेच्या प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी सांभाळतात. महिला उपक्रमांसाठी विशेष योगदान.

श्रीमती माधवी कापूरे
खजिनदारसंस्थेच्या आर्थिक व्यवस्थापनाची जबाबदारी पारदर्शकतेने सांभाळतात.

मा. चंद्रकांत भडकुंबे
सहसचिवग्रामीण भागातील उपक्रमांचे क्षेत्रीय समन्वय व अंमलबजावणी करतात.

मा. प्रदीप मरिबा नवघरे
सदस्यसंस्थेच्या सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन समाजसेवेत योगदान देतात.

मा. दिनेश कोळे
सदस्यसंस्थेच्या विविध कार्यक्रमांच्या आयोजनात व अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावतात.
आमच्याशी जोडा
स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हा, देणगी द्या किंवा आमच्या उपक्रमांमध्ये सहकार्य करा.